मडुऱ्यात नवनिर्वाचित जि. प. महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर यांचा सत्कार…

*💫बांदा दि.३१-:* भाजप नेते माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी जिल्हा परिषद महिला बालकल्याण समिती सभापती पदाची संधी दिल्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यास मी सदैव कटिबद्ध आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन, अशी ग्वाही जि. प. महिला बालकल्याण समिती सभापती सौ. शर्वाणी गावकर यांनी मडुरा येथे दिली. आरोंदा जि. प. सदस्या शर्वाणी गावकर यांची महिला बालकल्याण समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मडुरा गावाच्या वतीने माऊली मंदिर सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. देवस्थान समिती मानकरी दत्ताराम परब यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच साक्षी तोरसकर, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, कवठणी उपसरपंच अजित कवठणकर, पाडलोस माजी उपसरपंच विजय कुडतरकर, माजी ग्रा. पं. सदस्या सुजाता चिंदरकर तसेच भाजपा तालुका कार्यकारिणी सदस्य बाळू गावडे, पक्ष निरीक्षक अर्जुन शेर्लेकर, शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव, माजी उपसरपंच उदय चिंदरकर, सोमनाथ परब, ग्रा. पं. सदस्य साक्षी परब, संदिप परब, सुधीर नाईक, सिद्धेश नाईक, दाजी सातार्डेकर आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार नितीन नाईक यांनी मानले.

You cannot copy content of this page