कारिवडे शाळा नंबर ४ चे छप्पर कोसळले…

विद्यार्थी शाळेत नसल्याने अनर्थ टळला:प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा रवी परब यांचा आरोप

⚡सावंतवाडी ता.२१-: कारविडे येथील आपट्याचे गाळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ४ चे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे छप्पर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने शाळेत मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला.दरम्यान याबाबत जिल्हा परिषदेला वारंवार पत्रव्यवहार करून शाळा दुरुस्ती संदर्भात लक्ष वेधून देखील दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रवी परब यांनी केला आहे.

दरम्यान याबाबतची अधिक माहिती अशी की गेले दोन दिवस सावंतवाडी तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. त्या प्रमाणे कारविडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची छप्पर कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे आता तरी प्रशासनाने याची दखल घेवून शाळा दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी देखील रवी परब यांनी केली आहे. तसेच जर मुलांचे यात कोणतेही नुकसान झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा देखील यावेळी श्री परब यांनी प्रशासनाला दिला आहे.

You cannot copy content of this page