राष्ट्रप्रेमाने भारावून प्राध्यापकाचा थेट भारत-पाक सीमेपर्यंत सायकल प्रवास…

प्रा. अजित कानशिडे यांनी १२५० किमी अंतर कापून केले सैनिकांना अभिवादन :कुडाळ ते नडाबेट पर्यंतचा प्रवास ११ दिवसात केला पूर्ण..

⚡कुडाळ ता.२०-: ‘यात्रा राष्ट्रप्रेमाची’ या उपक्रमाअंतर्गत आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना भेटावे, त्यांना मानवंदना द्यावी या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक अजित कानशिडे यांनी कुडाळ ते नडाबेट-गुजरात असा १ हजार २५० किलोमीटरचा प्रवास रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता सायकलने पूर्ण केला. भारत-पाकिस्तान सीमेवरच्या नडाबेट याठिकणी त्यांनी भारतीय सैनिकांची भेट घेऊन त्यांना मानवंदना दिली. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना ११ दिवस लागले. एकूणच या प्रवासात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, भारतीय सैन्याची महती, मानवता, बंधुता यासह विविध भावना इतर अनेकांच्या सहकार्यामुळे जागृत करता आली असं प्रा. कानशिडे यांनी सांगितले. या संपूर्ण प्रवासात पत्रकार बाळा राणे यांनी त्याना चारचाकीतुन साथ केली. प्रा. अजित कानशिडे यांच्या या धाडसी उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
“यात्रा राष्ट्रप्रेमाची” या उपक्रमाअंतर्गत प्रा. अजित कानशिडे यांच्या सायकल प्रवासाचा शुभारंभ कुडाळ शहरातील बसस्थानक येथील सेल्फी पॉईंट येथून २७ मे २०२४ रोजी सकाळी झाला. या प्रसंगी त्यांना शुभेच्छारूपी आशीर्वाद देण्यासाठी ऍड. राजीव बिले, डॉ. संजय केसरे, अरविंद शिरसाट, रुपेश तेली, अभय शिरसाट, गजानन कांदळगावकर, रामा नाईकसह. अनेक नागरीक उपस्थित होते.
नडाबेट हेच ठिकाण का निवडले? या यात्रे चा हेतु काय? व या यात्रेतून साध्या काय? याबाबत आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. कानशिडे म्हणाले, वास्तविक मी या अगोदर पासुनच सोमेवरील जवानांना प्रत्यक्ष सीमेवर जावुन भेटण्याचा संकल्प केला होता मात्र नेमके कुठे जायचं हे पक्क केलं नव्हत मात्र असा विचार माझ्या शिक्षक मित्रांमध्ये मी प्रगट केला व गुजरात हिम्मतनगर येथील प्राध्यापक हेमंत पटेल यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी नडाबेट हे ठिकाण सुचवले. युट्युब व गुगलच्या साथीने माहिती मिळवून मो नडाबेट चा निर्णय पक्का केला व तसे नियोजन केले.
या सायकल प्रवासाला इतर मंडळो सुद्धा येणार होती पण त्यांच्या काही समस्यांमुळे ती येऊ शकली नाहीत. मग अखेर मो एकट्यानेच हा सायकल प्रवास करण्याचे निश्चित केले. अनेकांनो मला एकटे जाऊ नका असं सांगितले पण मी माझा निर्णय पक्काच केला होता पण अचानक बाळा राणे यांनी मो तुमच्या सोबत येणारच असा सुर धरला व अचानक फार कमी वेळात या सायकल प्रवासाच्या नियोजनात त्यांनी सहभाग घेतला. आम्हा दोघांचा कुडाळ ते नडाबेट हा प्रवास सुरू झाला मी स्वतः सायकलने व बाळा राणे हे कारने त्यांच्या कॅमेऱ्यासह व इतर शुटोग, टेक्निकल साहित्यासह सोबत होते.
आमचा हा प्रवास दिनांक २७ मे २०२४ सकाळी कुडाळ सेल्फी पॉइंट येथून राजापूर- वाटुळ-साखरपा-देवरूख-संगमेश्वर-चिपळूण-खेड-महाड-माणगाव-कोलाड-बदलापुर-पनवेल- तुभे-ऐरोली-ठाणे-घोडबंदर-वसई-विरार-तलासरी-सारीगाम-वापी-बळसाड-नवसारी-सुरत- अंकलेश्वर-भरुच-वडोदरा-आनंद-नडीयाद-अहमदाबाद (रिंगरोड)- अडालज-मेहसाना-राधनपुर- दईसर-सुइगाव-नडाबेट असा एकूण सुमारे १२५० कि. मी असा झाला या प्रवासादरम्यान माणूसको आपुलकी जोपासणारी राष्ट्रप्रेमाची भावना असलेलो अनेक व्यक्तिमत्वे भेटलो या सत्रांशी संवाद साथत साधत निसर्गाच्या सान्निध्यात थांबत थांबत हा अविस्मरणीय असा प्रवास घडला.
प्रा. कानशिडे हे बाळा राणे यांच्यासह अकराव्या दिवशा ७ जुन रोजी आम्ही नडाबेट येथील बीएसएफ मुख्य सुरक्षा प्रवेशव्दारासमोर पोहोचले. त्या दिवशीच त्यांनी झीरो पॉईट पर्यंतचा २५ कि.मी चा प्रवास केला व संपूर्ण परीसर तेथील कार्यरत बीएसएफचे जवान व गुजरात दुरीझमने साकारलेल्या नडाबेट येथील सर्व आकर्षक रोषणाई असलेला परिसराला त्यांनी भेट दिली. त्या रात्री तेथीलच जवळ असलेल्या नडेश्वरी माता मंदिर येथील भक्त निवासात राहून दुसऱ्या दिवशी सकाळी सायकल फोल्ड करून कारमध्ये ठेऊन त्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. एकूणच या पंधरा दिवसाच्या प्रवासात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, भारतीय सैन्याची महती, मानवता, बंधुता, सह अनेक विषयाची भावना इतर अनेकांच्या सहकार्यामुळे जागृत करता आल्याचे प्रा. कानशिडे यांनी सांगितले.
य प्रवासा दरम्याने स्वतःला शारिरिक, मानसिकदृष्ट्या तपासता आले. अनेक प्रांतातील अनेक लोकांशी संवाद साधून त्यांना समजून घेता आले. सामान्य नागरीकांमध्ये असलेल्या उदार मानसिकतेची प्रचिती आली.परेडच्या वेळी सैनिकांची हिंमत, तयारी, त्याग, जोश, तिरंग्याबद्दलचा अभिमान जवळुन पाहता आला. आमच्या तेथे जाण्याने सैनिकांना सुद्धा बरे वाटले. त्याचे समाधान आम्हाला लाभले. आपले हितचिंतक आपल्या यशाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरावर आहेत हे अनुभवता आले. संपूर्ण प्रवासाबद्दल एका वाक्यात सांगायचे तर केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे याची प्रत्यक्ष प्रचिती मिळाली. अंगी असणाऱ्या सकारात्मकतेत अजून बऱ्याच अंशी सकारात्मकता वाढली अनेक प्रकारे हि “यात्रा राष्ट्रप्रेमाची” ही प्रवास यात्रा प्रभावी ठरली.असल्याचे प्रा. अजित कानशिडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page