विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:तहसीलदार वीरसिंग वसावे यांची संकल्पना..
⚡कुडाळ ता.२०-: दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्या कि विद्यार्थ्यांची प्रवेशाची गडबड सुरु होते. आणि या प्रवेशासाठी वेगवेगळ्या शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते. हे दाखले ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना वेळेत मिळावेत, त्यांचा वेळ आणि पैसा वाचावा यासाठी जिल्हयात कुडाळ मध्ये आजपासून ग्रामीण भागात दाखले शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांची हि संकल्पना. आज माणगाव ग्राम पंचायत येथे ३० ते ३५ गावांतील विद्यार्थ्यांसाठी या दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थी आणि नागरिकांनी फार चांगला प्रतिसाद दिला. प्रातिनिधीक स्वरूपात तीन लाभार्थ्यांना तहसिलदार श्री. वसावे यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप करण्यातआले. या उपक्रमाबाबत माणगांव खोर्यातले विद्यार्थी व नागरीकानी समाधान व्यक्त केले.
कुडाळ तहसिल कार्यालयामार्फत माणगांव ग्रा.पं. मार्फत घेण्यात आलेल्या दाखले शिबीराला विद्यार्थी व नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. माझ्या पेक्षा तुमचा वेळ महत्वाचा आहे, त्यामुळे वेळेत दाखले मिळावेत या अनुषंगानेच या दाखले शिबीराचे माणगांव मध्ये आयोजन करण्यात आले असल्याचे कुडाळ तहसिलदार विरसींग वसावे यांनी सांगत विद्यार्थी व नागरीकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. शुक्रवार दि. २१ जून रोजी कडावल तर २२ जून रोजी नेरूर येथे दाखले शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे तहसिलदार श्री. वसावे यांनी सांगितले. यावेळी तात्काळ प्रातिनिधीक स्वरूपात तीन लाभार्थ्यांना तहसिलदार श्री. वसावे यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबाबत माणगांव खोर्यातील विद्यार्थी व नागरीकानी समाधान व्यक्त केले. माणगांव दौर्यावर असलेल्या आ. वैभव नाईक यांनी या शिबीराला भेट देत आढावा घेतला व उपक्रमाचे कौतुक केले.
शैक्षणिक वर्ष सुरू होवून सर्वच ठिकाणी शाळा, कॉलेज, विविध संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची दाखल्यांसाठी धावपळ सुरू आहे. ग्रामीण भागातील मुले दाखल्यांसाठी तालुका स्तरावर धावपळ करत जातात त्यात त्यांची वेळ व आर्थिक कुचंबणा होवू नये, या हेतूने कुडाळ तहसिल विभागाच्या वतीने खास दाखले शिबीराचे माणगांव ग्रामपंचायत हॉल मध्ये आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला गुरूवार सकाळ पासूनच माणगांव खोर्यातील विविध गावातील विद्यार्थी व नागरीकांनी उपस्थिती दर्शविली. विद्यार्थी व नागरीकांनी त्या- त्या दाखल्यांची (उत्पन्न, वय अधिवास, जात प्रमाणपत्र, ईडब्ल्युएस, नॉन क्रिमिनल आदि) आवश्यक ती कागदपत्रे शिबीर स्थळी सादर केली. त्यासाठी आवश्यक असणारा तलाठी अहवाल व मंडळ अधिकार्यांकडील अहवाल उपस्थित अधिकार्यांनी तात्काळ भरून देत सदर दाखले ऑनलाईन करून तात्काळ मंजुर करण्यात आले. शिवापूर येथील महादेव मेस्त्री, माणगांव येथील वामन डिचोलकर, सुरेश परब यांना प्रातिनिधीक स्वरूपात तहसिलदार विरसींग वसावे यांच्या हस्ते दाखले सुपूर्त करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान माणगांव सरपंच मनिषा भोसले यांनी कुडाळ तहसिलच्या या उपक्रमाचे खास कौतुक करत अशाच प्रकारची शिबीरे या पुढच्या काळातही राबविली जावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच मनिषा भोसले यांच्या उपस्थितीत उपसरपंच भिकाजी उर्फ बापू बागवे यांनी शाल, श्रीफळ देवून तहसिलदार श्री.वसावे यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
यावेळी माणगांव मंडळ अधिकारी आनंद नार्वेकर, गोठोस मंडळ अधिकारी रजनी ढवळ, माणगांव तलाठी विश्वास शेणवी, वसोली तलाठी अनिल राणे, घावनळे तलाठी मनिषा शिपुगडे, हिर्लोक तलाठी संतोष बांदेकर, वाडोस तलाठी शशिकांत परब, प्रशिक्षणार्थी तलाठी ओमकार केसरकर, सानिका गावकर, तनुजा बिरादार, कोतवाल प्रशांत दळवी, समिर तातावडे, अमित पिंगुळकर आदिसह माणगांव ग्रा.पं.चे कर्मचारी उपस्थित होते.
माणगांव दौर्यावर असलेले आ.वैभव नाईक यांनी माणगांव ग्रामपंचायत येथील दाखले शिबीराला भेट देत उपस्थित अधिकार्यांकडून आढावा घेतला. माणगांव तलाठी विश्वास शेणवी यांनी शिबीराबाबतची माहिती दिली. यावेळी आ. नाईक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सरपंच मनिषा भोसले, संघटक बबन बोभाटे, रमा ताम्हाणेकर, कृष्णा धुरी आदि उपस्थित होते.
