मणेरीत वीज खांबावर झाड पडून खांब तुटला; वीज गायब…

⚡दोडामार्ग ता.२०-: मणेरी गौतमवाडी येथे विजेच्या खांबावर झाड पडून खांब तुटला. सुदैवाने यात कुणाला इजा झाली नाही.वादळी वारा आणि पाऊस सकाळपासून सुरु होता. त्यावेळी अचानक एक झाड लगतच्या विजेच्या खांबावर पडले आणि वीज तारांसह खांब तुटून जमिनीवर पडला. त्यामुळे त्या परिसरातील वीज प्रवाह खंडित झाला आहे. विद्युत वितरण कंपनीने तत्काळ नवीन खांब उभा करुन वीज वाहिन्या ओढाव्या आणि वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी युवासेनेचे (शिंदे गट ) तालुकाप्रमुख भगवान गवस यांनी केली आहे.

You cannot copy content of this page