⚡वेंगुर्ला ता.१५-: प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी तुळस येथील श्री जैतिर उत्सवामध्ये सहभागी होत जैतिर देवाचे दर्शन घेतले आणि या वार्षिक उत्सवाचा आनंद लुटला.
जैतिर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात शुक्रवारी दिपोत्सव आयोजित केला होता. या दिपोत्सवातही शिल्पा तुळसकर यांनी सहभागी होत दिप प्रज्वलित केले. तर उत्सवाच्या सांगते दिवशी म्हणजेच कवळासादिवशी बराच वेळ भाविकांप्रमाणेच गर्दीत उभे राहून उत्सवाचा आनंद लुटला. ब-याच भाविकांनी शिल्पा तुळसकर यांच्यासोबत फोटोही काढले.