खास. नारायण राणे यांचे मालवणात जंगी स्वागत…

⚡मालवण ता.१७-: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच मालवणात आलेले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांचे नवनिर्वाचित खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आज सायंकाळी मालवणातील भाजप कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. कुंभारमाठ येथे ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच “राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी खास. राणे यांचे स्वागत केले.

खास. नारायण राणे मालवण तालुक्यात दाखल होणार असल्याने आज सायंकाळी भाजप कार्यकर्त्यांनी कुंभारमाठ येथे त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. खास. राणे यांचे आगमन होताच ढोल ताशांचा गजर करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी खास. राणे यांचे औक्षण केले. यावेळी खास. राणे यांच्या समवेत सौ. नीलम राणे उपस्थित होत्या. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पुष्पगुछ देऊन खास राणे यांचे स्वागत केले. तसेच यावेळी खास. राणे यांच्या हस्ते कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यानंतर मालवण शहरात भरड नाका येथेही फटाक्याच्या आतषबाजीत खास. राणे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर खास. राणे यांनी नीलरत्न या आपल्या निवासस्थानी प्रस्थान केल्यावर अनेक कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी गर्दी करत खास. राणे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, मंदार लुडबे, सूर्यकांत फणसेकर, आपा लुडबे, राजू परुळेकर, गणेश कुशे, उमेश नेरुरकर, सौ. सरोज परब, पूजा वेरलकर, पूजा करलकर, पूजा सरकारे, अन्वेषा आचरेकर, महानंदा खानोलकर, शर्वरी पाटकर, ममता वराडकर, संदीप परब, ललित चव्हाण, निशय पालेकर, निनाद बादेकर, राजू बिडये, आबा हडकर आदी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page