⚡सावंतवाडी ता.१५-: येथील विठ्ठल मंदीर शेजारील मारुती मंदीर जिर्णोद्धारासाठी भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सढळ हस्ते मदत केली.
आज शनिवारी आरतीसाठी विशाल परब हजर राहिले असता त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सुमीत वाडकर, भुपेंद्र सावंत, सौ. गौरी परुळेकर परब, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, केतन आजगांवकर, गणेश पडते, सुदेश नेवगी, अमित गवंडळकर आदी उपस्थित होते.