भाजप युवा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते लज्जिता दिलीप भालेकर हिचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१५-: देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात शिकत असणाऱ्या लज्जिता दिलीप भालेकर हिने महाविद्यालयातून व जिल्ह्यातूनही दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल भाजप युवा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

लज्जिता भालेकर हिने मुंबई विद्यापीठाची बी. एम. एस.(बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) ही पदवी प्राप्त केली आहे.
यावेळी ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक सुधीर आडीवडेकर, केतन आजगावकर, दिलीप भालेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, गणेश पडते, अमित गौंडळकर, नागेश जगताप, सुदेश नेवगी, तेजस माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page