अॅड दिलीप नार्वेकरांमुळे मी घडलो…

अॅड अनिल निरवडेकर ; या भागात भाजपला घवघवीत यश मिळवून देऊया व विशाल परब यांच्या पाठीशी राहूया; ५० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा..

⚡सावंतवाडी ता.१५-: मी जो काही घडलो आणि येथे पर्यंत पोहोचलो आणि ज्यांच्या सहवासात आणि मार्गदर्शनाखाली खूप काही शिकता आले असे माझे गुरुवर्य जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष माझे मार्गदर्शक प्रेरणास्थान एडवोकेट दिलीप नार्वेकर आहेत ते एक जगण्याची वेगळी प्रेरणा देतात. अशा शब्दात आपल्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व एडवोकेट अनिल निरवडे कर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.दरम्यान आपण सर्वांनी जो ध्यास घेतला आहे आणि एकजुटीने आपण या मतदारसंघात आणि या भागात भाजपला घवघवीत यश मिळवून देऊया आणि युवा उद्योजक विशाल परब यांच्यासोबत आपण एकजुटीने राहूया असेही ते म्हणाले.श्री. निरवडेकर यांचा आज ५० वा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवार व भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते व्यासपीठावर बोलत होते.

ते पुढे म्हणाले की यावेळी भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब म्हणाले सन 19 91 92 या कालावधीत आम्ही राजकारणात सक्रिय झालो होतो माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही राजकारण समाजकारणात आलो एडवोकेट अनिल निरवडे कर यांची ओळख माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी करून दिली आणि तेव्हापासून मी एडवोकेट निरवडे कर यांना पाहतो हे व्यक्तिमत्व प्रेमळ आणि जीवाला जीव देणारे आहे राजकारणात आमच्यावर जेव्हा अनेक केसेस झाल्या त्या केसेस सोडवण्यासाठी अविरत प्रयत्न आणि सर्व मदत त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी सर्व ताकतीनेशी उभे राहणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे गरिबांचे जणू ते कैवारीच आहे असे कौतुकही श्री परब यांनी केले विशाल परब मित्र मंडळाच्या वतीने आणि सावंतवाडी भाजप परिवाराच्यावतीने एडवोकेट अनिल निरवडे कर यांचा पन्नासावा वाढदिवस आज श्री परब यांच्या भाजप संपर्क कार्यालयात केक कापून करण्यात आला यावेळी युवा उद्योजक विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देऊन ऍडव्होकेट निरवडे कर यांचा सत्कार केला यावेळी माझी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर केतन आ जगावकर दिलीप भालेकर दिपाली भालेकर आदी उपस्थित होते यावेळी एडवोकेट निरवडे कर पुढे म्हणाले आपण सर्वजण इथे एकत्र आलो आहोत आणि विशाल परब यांच्या संपर्क कार्यालयात माझा पन्नासावा वाढदिवस साजरा होत आहे खरोखरच मी धन्य आहे माझा मी वाढदिवस साजरा करत नाही मी नेहमी आनंद आश्रम येथे जातो आणि तेथे मदत कार्य करून माझा वाढदिवस साजरा करतो परंतु कधीही मी प्रसिद्धी केली नाही आणि मला ती सवयी नाही मात्र मी जो आज काय उभा आहे तो मार्गदर्शक एडवोकेट दिलीप नार्वेकर यांच्या मुळेच त्यांच्या ठिकाणी मी काही खूप शिकलो ते समाजकारण राजकारण आणि वकिलीक्षेत्रात एक मोठे व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व या भागाचे आमदार मंत्री व्हायला हवे होते त्यांच्याकडे पाहिल्यावर व त्यांच्या सहवासात गेल्यावर त्यांच्याकडून जगण्याची एक वेगळी उमेद मिळते असे ते म्हणाले खरंतर आपण सर्वजण च्या विचारधारेने एकत्र आलो आहोत त्या विचारधारा आपण एकत्र येऊन विशाल परब यांच्या पाठीशी खंबीर राहूया आणि सर्वांनी आपण यापुढे सर्व निवडणुकीत भाजपला यश मिळेल या दृष्टीने काम करूया अशा शब्दातही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी विशाल परब यांनी आम्ही सर्वजण गरिबीतून पुढे आलो आहोत गरीबी काय असते सर्वसामान्यांच्या व्यथा काय असतात हे आम्हा सर्वांना माहित आहे एडवोकेट अनिल निरवडे कर हे सामाजिक आणि वकील क्षेत्रात मोठे कार्य करत आहेत त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व आम्हाला मित्र म्हणून लाभले आहेत.

यावेळी केतन आजगावकर सुधीर आडीवरेकर आदींनी आपले विचार मांडले

यावेळी सुधिर आडीवरेकर,दिलीप भालेकर,दिपाली भालेकर,केतन आजगावकर, सुधेश नेवगी,नागेश जगतप,अनिकेत वाडेकर,गणेश पडते,अमीत गंवडळकर,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page