टेलरच्या हौदातील इलेक्ट्रिक मोटर चोरीस…

⚡कणकवली ता.०८-: टेलरच्या हौदातील एबीबी कंपनीच्या वाॅटर कुलरची 15 हजार रुपये किमतीची 10 एचपी इलेक्ट्रिक मोटर चोरीस गेली. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


दुधाजी भगवान नागगोटे (38) हे टेलरमधून (एम एच 23 एयु 5727) इलेक्ट्रिक साहित्य घेऊन गोवा ते अहमदाबाद घेऊन जाते होते. शुक्रवारी रात्री ते ओरसगाव टोलनाका येथे थांबले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी अहमदाबादकडे जाण्यास निघाले होते. नांदगाव येथे आल्यानंतर त्यांनी हौदातील साहित्य तपासले असता इलेक्ट्रिक मोटर चोरीस गेल्याचे दिसून आले. याप्रकरणी दुधाजी नागगोटे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page