विनायक राऊत यांना शहरात मिळालेली मतं ही निष्ठेची…

शैलेश गवंडळकर: घात केलेल्यांना थोड्या दिवसात विनायक राऊतांची येईल आठवण..

सावंतवाडी ता.०६-: शहरात विनायक राऊत यांना मिळालेली पाच हजार मते ही निष्ठेची प्रामाणिक मतदारांची असून, हे मतदार पैशांला बळी पडले नाही अशी प्रतिक्रीया सावंतवाडी उबाठाचे शहरप्रमुख शैलेश गवंडळकर यांनी दिली.दरम्यान पैशासाठी मत विकणाऱ्या मतदारांनी चांगल्या उमेदवारांचा घात केला असून नक्कीच त्यांना थोडया दिवसात विनायक राऊतांची आठवण येईल असे ते यावेळी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

ते म्हणाले की संघटना म्हणून पक्ष व चिन्ह गेल्या नंतर ही पहिलीच निवडणूक होती प्रत्येक पदाधिकारी यांनी आप आपल्या क्षमतेने प्रचार केला.काही गोष्टी कमी पडल्या तरी आपण कुठे मागे राहिलो नाही येणाऱ्या परिस्थिती वर मात केली. मतदारांचा शिवसेना पायी असलेला उत्साह पाहून वाटत होते.मतपेटीत मशाल च पुढे असेल ,पंरतू असे झाले नाही. खासदारांना आलेले अपयश आमचे सर्वाचे असून आम्ही सर्वजण भागीदार आहोत ज्याप्रमाणे पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे यांनी महाराष्ट्रात काही शिल्लक नसताना झंझावात निर्माण करून यश मिळविले तीच उर्जा घेऊन कामाला लागूया असे ही श्री गवंडळकर यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.

You cannot copy content of this page