संजू परब यांनी माझ्यावर केलेला आरोप म्हणजे एक प्रकारे “बालिशपणा”…

राजन तेली: आमदारकीसाठी इच्छुक असतील तर पक्षाकडे उमेदवारी मागावी…

⚡सावंतवाडी ता.०१-: स्वतःच्या गावात पाच दिवस लाईट नसताना ती सुरळीत न करू शकणारे संजू परब यांनी माझ्यावर आरोप करू नये. मी माझ्या स्वतःच्या कामासाठी न जाता मी जनतेच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी गेलो होतो. त्यामुळे माझ्यावर केलेला आरोप म्हणजे संजू परब यांचा हा बालिशपणा आहे असा पलटवर माजी आमदार राजन तेली आज इथे केला.

दरम्यान, विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन राहिले असताना काही लोकांना आता आमदारकीचे स्वप्न पडू लागलीत. जर ते आमदारकीसाठी इच्छुक असतील तर त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागावी. प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे असे तेली यांनी सांगत परब यांना टोला लगावला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page