तालुक्यातील शिक्षक संघटनानी केले स्वागत..
⚡दोडामार्ग ता.३०-:
दहा वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर
तालुक्याला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळाले.रुपाली दिनकर तेलतुंबडे यांनी २४ मे रोजी कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी म्हणून तालुका शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारला.दोडामार्ग पंचायत समितीच्या २२ वर्षांच्या काळातील हे तिसरे कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी.यापूर्वी शिवानंद गुरव व प्रदीपकुमार कुडाळकर यांनी कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले होते.
मधल्या काळात विस्तार अधिकारी किशोर गवस आणि निसार नदाफ यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून तालुका शिक्षण विभागाचा कारभार सांभाळला होता.श्री.गुरव यांनी २००५ मध्ये तर श्री.कुडाळकर यांनी २०१०-११ च्या दरम्यान पदभार स्वीकारला होता.त्यांच्या बदलीनंतर शिक्षण विभागाला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळाले नव्हते.मधल्या जवळपास सहा आणि दहा वर्षाच्या खंडानंतर आता पुन्हा एकदा रुपाली तेलतुंबडे यांच्या रूपाने कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी तालुका शिक्षण विभागाला मिळाले आहेत.त्यामुळे अखिल भारतीय शिक्षक संघाच्या दोडामार्ग शाखेच्या वतीने रुपाली तेलतुंबडे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष गवस, सचिव अनिल ठाकर, राजन काळबेकर, संतोष नाईक, जिल्हा प्रतिनिधी पूनम पालव व गुरूदास कुबल,गोपाळ गवस, कृष्णा गवस,आनंद नाईक, डी. एन. पावरा, उदय गवस, कृष्णा दळवी, गुरूदास सावंत,राजन कोरगावकर मीनल पेडणेकर,प्रवीण देसाई
आदीनी स्वागत केले.
तसेच अन्य शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेऊन स्वागत केले.
