संजू परब; राणेंच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या मांडीला मांडीला लावून बसणं अत्यंत चुकीचं…
⚡सावंतवाडी ता.३०-: ज्यांनी अंडरग्राउंड वीज वाहिनीचे 11 कोटी परत पाठवले त्यांना शहरातील वीज प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा पलटवार संजू परब यांनी बबन साळगावकर यांच्यावर केला.
दरम्यान राणेंच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून प्रश्न सोडवणे अत्यंत चुकीच आहे. असं मत देखील श्री परब यांनी यावेळी व्यक्त केले. याबात श्री.परब यांनी राजन तेली व विशाल परब व इतर भाजप पदाधिकारी यांच्याबाबत नाव न घेता नाराजी व्यक्त केली. श्री संजू परब आज सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी परब पुढे बोलताना म्हणाले की केसरकर अकार्यक्षम असल्याने शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले का असा सवाल देखील श्री. परब यांनी यावेळी उपस्थित केला.दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री हे सक्षम असून जनतेच्या प्रश्नासाठी ते कटिबद्ध आहेत त्यामुळे कोणीही पालकमंत्र्यांची नाहक बदनामी करू नये दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपचे पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचा जेव्हा विषय आला तेव्हा त्यांनी का विरोध केला नाही असं सवाल ही श्री परब यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे येणाऱ्या चार दिवसात आम्ही सर्व वीज वितरण चे प्रश्न पालकमंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लावू असा शब्दही श्री. परब यांनी यावेळी दिला
