वीस वितरणच्या प्रश्नासंदर्भात बबन साळगावकर यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही…

संजू परब; अन्यथा राजन तेली व विशाल परब यांची वरिष्ठांकडे तक्रार करणार; नाव नाव घेता दिला इशारा..

⚡सावंतवाडी ता.३०-: ज्यांनी अंडरग्राउंड वीज वाहिनीचे 11 कोटी परत पाठवले त्यांना शहरातील वीज प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा पलटवार संजू परब यांनी बबन साळगावकर यांच्यावर केला.

दरम्यान राणेंच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून प्रश्न सोडवणे अत्यंत चुकीच आहे. प्रश्न सोडविण्यास भारतीय जनता पार्टी सक्षम असल्याचेही परब म्हणाले. दरम्यान यापुढे जर राणेंण्यांच्या विरोधात काम करणाऱ्या सोबत जर आमचे पदाधिकारी बसले तर त्यांची तक्रार मी वरिष्ठांकडे करेल असा इशारा देखील यावेळी संजू परब यांनी राजन तेली व विशाल परब व इतर पदाधिकाऱ्यांना नाव घेता दिला आहे. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी परब पुढे बोलताना म्हणाले की केसरकर अकार्यक्षम असल्याने शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले का असा सवाल देखील याविषयी परब यांनी यावेळी उपस्थित केला.दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री हे सक्षम असून जनतेच्या प्रश्नासाठी ते कटिबद्ध आहेत त्यामुळे कोणीही पालकमंत्र्यांची नाहक बदनामी करू नये दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपचे पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचा जेव्हा विषय आला तेव्हा त्यांनी का विरोध केला नाही असं सवाल ही श्री परब यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे येणाऱ्या चार दिवसात आम्ही सर्व वीज वितरण चे प्रश्न पालकमंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लावू असा शब्दही परब यांनी यावेळी दिला

You cannot copy content of this page