तिलारी घाटात पिकअप कोसळला…

कुणीही जखमी नाही ;गाडीचे नुकसान.

⚡दोडामार्ग ता.३०-: तिलारी घाटात अवजड ट्रकचा अपघात झाला त्याला दोन दिवस उलटत नाहीत तोच आणखी एक अपघात घाटात झाला. बेळगावहून दोडामार्गकडे टोमॅटो घेऊन येणारा पिक अप ( के ए 23 बी 6138 ) एका तीव्र उतार आणि वळणावर उलटला. चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव पिकअप कठडा तोडून खाली कोसळला.पिकअप पलटी झाल्याने पिकअपचे आणि टोमॅटोचे नुकसान झाले. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. अपघात सकाळी साडेपाचच्या दरम्यान झाला. दरम्यान, अपघातग्रस्त पिकअपचे दोन टायर (चाके )अज्ञाताने चोरून नेले.

You cannot copy content of this page