पावसाळ्याच्या तोंडावर तात्काळ विज वितरणची कामे मार्गी लावा…

सावंतवाडी येथे बैठकीत सर्वपक्षीयांची मागणी; अन्यथा गाठ आमच्याशी..

⚡सावंतवाडी ता.३०-: पावसाळा तोंडावर आला तरी महावितरण कडून पूर्वतयारी कोणतीच झालेली नसून ह्याचा फटका ग्राहकांना होत आहे. त्यामुळे तात्काळ मतदारसंघातील सर्व प्रश्न मार्गी लावा अशी मागणी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज विज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली.

दरम्यान ज्या ठिकाणी आपल्याला कोणती अडचणी येत असेल तर त्या आपण आम्हाला कळवावे आम्ही वरिष्ठ स्तरावरून आपल्याला जे काय मदत लागेल ते आम्ही देऊ परंतु कोणतेही हल्कर्जीपणा न करता पावसाळ्यापूर्वी मार्गी लावावे अन्यथा पावसाळ्यात कोणतेही नागरिकांना त्रास झाला तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा देखील यावी सर्व पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी दिला. येथील मॅंगो वन येथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या वीजेच्या समस्या मांडण्या साठी लोकप्रतिनिधी, ग्राहक, अधिकारी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.

याबाबतची अधिक माहिती अशी की
महावितरण च्या अंधाधुंदी कारभारबाबत सर्वच नागरिक त्रासलेले आहेत. विज पुरवठा वारंवार खंडित होत आहे, त्यामुळे संताप झालेल्या नागरिकांनी आज सर्व पक्षांचे उपस्थितीत बैठक लावली होती यावेळी विविध असलेल्या समस्यांना बाबा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला यावेळी पावसाळ्यापूर्वी ही सर्व काम मार्गी लावावीत अन्यथा तुमची गाठ आमच्याशी आहे असा इशारा देखील सर्व पक्षाच्या नेत्यांनी यावेळी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. दरम्यान आम्ही हे सर्व आपल्या मागणीची दखल घेऊन जास्तीत जास्त हे प्रश्न सोडवण्याचे आम्ही प्रयत्न करू असा शब्द वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

यावेळी माजी आमदार राजन तेली, युवा उद्योजक विशाल परब, सकल मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, पुंडलिक दळवी, अजय गोंदावळे,राजू बेग, ॲड.अनिल केसरकर,दिलीप भालेकर एकनाथ नाडकर्णी,मिलिंद सावंत, चंद्रकांत कासार,अँड. निंबाळकर बंटी पुरोहित दी यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page