गिणी कामगार चळवळीचे मुंबईत 2 जून रोजी आंदोलन…

⚡कणकवली ता.३०-: गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना न्याय मिळवा याकरिता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगार चळवळी यांच्यावतीने रविवार 2 जून रोजी सकाळी 10 वा. मुंबईत करीरोड येथील भारत माता सिनेमागृहासमोर प्रभू रामचंद्रांची अखंड रामरक्षा व हनुमान चालिशी नामस्मरण पठाण करून अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.


गिरणी कामगार व त्यांचे वारस आणि मराठी माणसांचे जीवन राज्य सरकारने आस्थर केले आहे. मराठी माणसांवरचा अन्याय दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याला राजकीय पक्षांचे नेतेच जबाबदार आहेत. राज्य सरकारला गिरणी कामगार व त्यांच्या वासरांची ताकद दाखवून देण्यासाठी गिरणी कामगार चळवळी कार्यरत आहे. गिरणी कामगार व वारसांच्या 42 वर्षांचा संघर्षाला न्याय लवकरच मिळावा म्हणूनच प्रभू रामचंद्राचे अखंड रामरक्षा व हनुमान चालिशी नामस्मरण पठाण करण्यासाठी मुंबईतील गिरणी कामगार व त्यांचा वारसांनी ठरवले आहे. या अनोख्या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन चळवळीतर्फे करण्यात आले आहे. या आंदोलनाविषयी अधिक माहितीसाठी (9833439242,7021950238)या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन गिरणी कामगार चळवळीने केले आहे.

You cannot copy content of this page