बीडवाडी विद्यालयाचा सलग 12 वर्षी 100 टक्के निकाल…

⚡कणकवली ता.३०-: माध्यमिक विद्यालय, बीडवाडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल सगल 12 वर्षे 100 टक्के निकाल लागला आहे. महिमा महेश परब हिने 82.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकाविला. प्राची मारुती चिंदरकर 81.20 टक्के गुण मिळवून द्वितीय तर समीक्षा संदीप राणे 79.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 26 विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विशेष श्रेणीत 7, प्रथम श्रेणीत 16, द्वितीय श्रेणीत 1, तर तृतीय श्रेणीत 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशवंतांचे बीडवाडी पंचक्रोशी शिक्षण संस्था (मुंबई) अध्यक्ष मधुकर वाडेकर व पदाधिकारी, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दत्ताराम हिंदळेकर व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदराव साटम व पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष पांडुरंग मगर, मुख्याध्यापक सुमुख जोशी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page