विशाल परब: वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली मागणी..
सावंतवाडी ता.३०-: ऐन पावसाळा तोंडावर असताना सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील महावितरण चे विजवाहक खांब गंजलेले आहेत. यातून मानवी जीवाला धोका तसेच आपत्ती निर्माण होऊ शकते, या अनुषंगाने विजवाहक खांब बदलावेत आणि त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विशाल परब यांनी केली आहे.दरम्यान यावेळी आज महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या समावेत शहरातील सर्व पक्षांच्या वतीने बैठक संपन्न झाली. यावेळी विशाल परब यांनी ही मागणी केली आहे.
ते म्हणाले,आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. अनेकदा पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन असंख्य प्रश्नांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर महावितरण ने तात्काळ वीजवाहक खांब दुरुस्ती तसेच बदलण्याच्या दृष्टीने काम करावे”, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केली आहे.
यावेळी भाजपा विधानसभा अध्यक्ष राजन तेली, भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, माजी जी. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शेखर गावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, विलास जाधव, सुरेश भोगटे, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, माजगाव उपसरपंच बाळू वेझरे, दिलीप भालेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, सावंतवाडी भाजपा मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, पत्रकार सिताराम गावडे, मिलींद सावंत आदी उपस्थित होते.
