बबन साळगावकर यांचा आरोप:विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात मोठं कॅम्पिंग उभारून केसरकरांच भुलभुलय्या उघड करणार..
⚡सावंतवाडी ता.३०-: शहरातील भुयारी गटार योजनेच्या निधी माझ्यामुळे नव्हे तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यामुळेच परतून गेला असा पलटवार माझ्या नगराध्यक्ष बबन सांगावकर यांनी आज येथे केला खोदाई केलेले रस्ते बुजवण्यासाठी डीपीडीसी मधून निधी देतो असे सांगून तो निधी केसरकर यांनी न दिल्याने हे काम झाले नाही. त्यामुळे ते खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही साळगावकर यांनी केला.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात मतदारसंघात मोठं कॅम्पेनिंग उभारून जनतेची केलेली भुलभुलय्या उघड करणार असेही साळगावकर यांनी यावेळी बोलताना म्हणाले. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते
