सावंतवाडीत उद्या वीज वितरण कार्यालयात बैठकीच आयोजन…

ज्यांच्या समस्य असतील त्यांनी लेखी स्वरूपात घेऊन उपस्थित राहावे; राजन तेलींचे आव्हान..

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी महावितरण कार्यालय येथे माजी आमदार राजन तेली यांनी महावितरण जिल्हा अधिक्षक अभियंता , कार्यकारी अभियंता , उपकार्यकारी अभियंता,कर्मचारी आणि महावितरण ( MSEB ) चे ठेकेदार यांच्या सोबत एकत्रित बैठक घेऊन चर्चा आयोजन केले आहे.

तरी सावंतवाडी विधानसभेतील गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांना आवाहन करण्यात येते की, आपण आपल्या परिसरातील वीजेचे कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्यास आपण लिखीत स्वरुपात घेऊन समक्ष उपस्थित रहावे. आपल्या समस्यांवर चर्चा करुन योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले आहे.

You cannot copy content of this page