अमित सावंत यांचे निधन…

⚡कणकवली ता.२९-: कणकवली शहरातील टेंबवाडी येथील रहिवासी अमित गोपाळ उर्फ बाळा सावंंत (38) यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अमित यांची प्रकृती अलीकडे ठिक नव्हती. मंगळवारी राहत्या घरी त्यांना अवस्थ वाटू लागले. त्यांना येथीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासाअंती त्यांचे निधन झाले होते. अमित यांचा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात वडील, दोन भाऊ, दोन बहीणी, भावयजा, भावोजी, पुतण्या असा असा मोठा परिवार आहे. हाँटेल न्यू कमलचे मालक गोपाळ उर्फ बाळा सावंत यांचा तो मुलगा होय.

You cannot copy content of this page