23 विद्यालयांचा 100 टक्के निकाल ः सेंट उर्सुलाची निधी सावंत 100 टक्क्यांसह तालुक्यात प्रथम..
कणकवली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला. यात कणकवली तालुक्याचा 99.06 टक्के निकाल लागला आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 1505 विद्यार्थ्यांपैकी 1491 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील 29 विद्यालयांपैकी 23 विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. सेंट उर्सुला वरवडेची निधी प्रकाश सावंत हिने 100 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची विद्यार्थिनी गायत्री विजयकुमार राठोड हिने 99.20 टक्के गुण मिळवून द्वितीय तर याच हायस्कूलची मानसी राजन नाणचे हिने 98.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
एस. एम. हायस्कूलचा 98.30 टक्के निकाल लागला आहे. विद्यामंदिर प्रशालेचा 99.47 टक्के निकाल लागला आहे. शेठ एन. एफ. विद्यालय, खारेपाटणचा 100 टक्के निकाल लागला आहे. न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचा 100 टक्के निकाल लागला आहे. माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा 100 टक्के निकाल लागला आहे. कळसुली इंग्लिश स्कूलचा 100 टक्के निकाल लागला आहे. कासार्डे माध्यमिक विद्यामंदिरचा 99.19 टक्के निकाल लागला आहे. नरडवे इंग्लिश स्कूलचा 100 टक्के निकाल लागला आहे. सरस्वती विद्यामंदिर नांदगावचा 100 टक्के निकाल लागला आहे. विद्यामंदिर हरकुळ खुर्दचा 100 टक्के निकाल लागला आहे. ल. गो. सामंत विद्यामंदिर हरकुळ बु.चा 100 टक्के निकाल लागला आहे. वामनराव महाडिक माध्यमिक विद्यामंदिर तळेरेचा 100 टक्के निकाल लागला आहे. ना. पै. प्रबोधिनी करूळचा 98.24 टक्के निकाल लागला आहे. शिवडाव माध्यमिक विद्यामंदिरचा 100 टक्के निकाल लागला आहे. आदर्श विद्यामंदिर सावडावचा 100 टक्के निकाल लागला आहे. माध्यमिक विद्यामंदिर नाटळचा 100 टक्के निकाल लागला आहे. माध्यमिक विद्यामंदिर बीडवाडीचा 100 टक्के निकाल लागला आहे. शंकर महादेव विद्यालय, कुंभवडेचा 100 टक्के निकाल लागला आहे. माध्यमिक विद्यामंदिर घोणसरीचा 100 टक्के निकाल लागला आहे. न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव-बोर्डवेचा 100 टक्के निकाल लागला आहे. माध्यमिक विद्यामंदिर शेर्पे-कुरंगवणेचा 100 टक्के निकाल लागला आहे. शेठ एम. व्ही. केसरकर माध्यमिक विद्यामंदिर वारगावचा 100 टक्के निकाल लागला आहे. उर्दु माध्यमिक विद्यामंदिर हरकुळ बु.चा 100 टक्के निकाल लागला आहे. के. एन. एस. पी. आदर्श विद्यामंदिर करंजेचा 96.15 टक्के निकाल लागला आहे. विद्यामंदिर लोरे-वाघेरीचा 65 टक्के निकाल लागला आहे. सेंट उत्सुर्ला 100 टक्के निकाल लागला आहे. बाल शिवाजी इंग्लिश स्कूल, जानवलीचा 100 टक्के निकाल लागला आहे. आयडियल न्यू इंग्लिश स्कूल वरवडेचा 100 टक्के निकाल लागला आहे. न्यू. ई. एम. हायस्कूल नडगिवेचा 100 टक्के निकाल लागला आहे.
