⚡कणकवली ता.२६-: माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या पूर्व नियोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी 1 जून रोजी सकाळी 10. 30 वा. कनेडी हायस्कूलच्या ज्ञानदीप सांस्कृतिक भवनात कनेडी दशक्रोशीतील कनेडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कनेडी हायस्कूलमध्ये 1953 पासून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 23 जून 2024 रोजी मुलुंड, मुंबई येथे होणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी या बैठकीचे आयोजन केले असून माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.
