देवगड तालुक्यातील घटना..
देवगड (प्रतिनिधी)
नवजात बालकाला जन्म दिला, मात्र बालकाला पाण्याआधीच मातेने या निरोप घेतला निरोप घेतला झाला,ही दुर्दैवी घटना देवगड मध्ये घडली. असून प्रसूतीसाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेल्या महिलेचा प्रसूतीमध्ये मुलांला जन्म दिल्यानंतर अतिरक्तस्त्रावाने केवळ चार तासात जिल्हा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला १८ मे रोजी रात्री ८:०५ वाजता प्रसूतीसाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेला पहिला मुलगा असून दुसऱ्या प्रसूतीसाठी तिला दाखल करण्यात आले होते. प्रसुती होऊन तिला मुलगा झाला. मात्र काही क्षणातच त्यांना अतिरक्तस्त्राव होऊ लागल्याने देवगड ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी देण्यात आले. मात्र तपासणीअंती ती मध्यरात्री १२:३० वा, सुमारास डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. केवळ चार तासातच मुलाला जन्म झाल्यानंतर मातेचा अतिरक्तस्त्रामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची खबर महिलेचे पती यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली. त्यानुसार देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे हेड कॉस्टेबल राजन जाधव करीत आहेत.
