विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद सदैव सर्वांच्या पाठीशी राहो…

विशाल परब:वेंगुर्ल्यात घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन…

⚡वेंगुर्ला ता.१९-: श्री विठ्ठल रुक्मिणी हे वारकरी संप्रदायाचे माहेर मानले आहे. आज असलेल्या मोहिनी एकादशीचे औचित्य साधून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी येथील वै. चांदेरकर महाराज यांच्या विठ्ठल मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद सदैव सर्वांच्या पाठीशी राहोत अशी प्रार्थना केली. देवस्थान तर्फे विशाल परब यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सावळाम कुर्ले महाराज, अंकुश वराडकर, चित्रा केरकर, देवयानी केरकर, रत्ना नार्वेकर, रजनी वराडकर, हेमा मयेकर, लीला टाककर, सौ अंधारी, गजानन कुबल, गौतमी कुबल, भुवनेश कुबल, दिवाकर कूर्ले, दिलीप कुर्ले, किशोर रेवटकर, राजा वेंगुर्लेकर, लक्ष्मीताई तांडेल, संध्या गोवळकर, सुमा कुर्ले, लता मसुरकर, जोत्सना कुबल, सुजा भुते, प्रतिक गिरप, पूर्वेश तोरस्कर, मयुरेश गिरप, चिराग गिरप आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page