ज्येष्ठ शिवसैनिक अशोक परब: पोलिसांकडे केली मागणी..
⚡बांदा ता.२०-: या भागात सातत्याने परप्रांतीयांचा वाढलेला उपद्रव, व त्या पातळीवर वाढणाऱ्या उपद्रवा बाबत शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परब यांनी येथील पोलिस ठाण्यात या बाबत लक्ष देऊन अश्या प्रकारे येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद आपल्या दप्तरी ठेवण्यात बाबतच्या सूचना केल्या.
या वेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भाई जाधव व पत्रकार रामदास जाधव उपस्थित होते.
गेले काही दिवस बंद भाग परप्रांतीयांचा उपदावामुळे काहीश्या प्रमाणात त्रस्त आहे. याचे कारण परप्रांतीयांच्या काढून काही प्रमाणात गुन्हे घडताना समोर येत आहेत. बऱ्याच प्रमाणात याचा त्रास महिला वर्गाला सहन करावा लागत आहे. महिलांचे, तरुण मुलींचे मोबाईल नंबर घेऊन त्यावर अश्लील मेसेजेस पाठवणे, त्यांना फोन करणे, आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, या सह, चोऱ्यामाऱ्या, मारामाऱ्या, आत्महत्या की हत्या हे अजून तरी घडलेल्या गुन्ह्यातून समोर आले नाही, परंतु या सारखे गुन्हे घडत आहेत.
मुळात बांदा हा भाग शांत आहे या भागात जी गावे आहेत, ती बरीचशी गावे ग्रामीण भागातील आहे. बांदा शहर हे मुख्य आहे. परंतु या शहरालाही अध्यापिशहरिकरणाने तसा स्पर्श केला नाही. मात्र येत्या काही वर्षात शहरी गुन्हेगारी येऊ शकते. या साठी उपाय योजना म्हणून आपण या कडे बघताना. या भागात येणाऱ्या परप्रांतीयांची कसून चौकशीसह त्यांची पूर्ण माहिती. घ्यावी. जे घरवाले अश्याना भाड्याने घर देतात, त्यांनाही सूचना करून त्यांच्याशी संपर्क करून माहिती घ्यावी. आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील पोलिस पाटलाला. अश्या प्रकारे माहिती घेण्याच्या सूचना कराव्यात.जेणेकरून वाढणाऱ्या गुन्हेगारीवर आपल्याला ताबा ठेवता येईल. किंव्हा गुन्हेगार पर्यंत पोहोचता येईल. सध्यातरी महिला वर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहे. याचेही आपण निरीक्षण करावे. थोड्याच दिवसात. शाळा महाविद्यालये सुरू होणार, वर्दळ वाढणार. या कडेही लक्ष असावे. अश्या प्रकारच्या सूचना या वेळी बांदा पोलिसांना केल्या.
या सर्व सुचानावर बोलताना बांदा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी झाजूर्णे यानी सूचना ऐकून आपले पोलिस या बाबत योग्य ती कारवाई करतील. पण भाडोत्री बाबत घरवाल्यांकडून माहिती येत नाही हा मुद्दा तर आहेच. पण ज्या वेळी अश्या प्रकारच्या घटना
