⚡मालवण ता.१९-:
चिंदर बाजार येथील साई मंदिरात दि. २९ मे रोजी साई भंडारा व श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी साईंच्या मूर्तीवर लघुरुद्र सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, स्थानिक भजने, रात्री मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळ मोचेमाड वेंगुर्ले यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
चिंदर येथील साई मंदिरात विविध कार्यक्रम…
