अन्यथा आंदोलनाचा इशारा; ग्रामस्थांनची जि. प. बांधकाम उपअभियंता उपविभाग यांच्याकडे केली मागणी..
⚡मालवण ता.१९-: मालवण तालुक्यातील आंबेरी चव्हाटा ते गणेशकोंड रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी, अशी मागणी आंबेरी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे उपअभियंता जि. प. बांधकाम उपविभाग मालवण यांच्याकडे केली आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आंबेरी चव्हाटा ते गणेशकोंड रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या छोट्या मोठ्या वाहनांची येण्या जाण्याची कोंडी होत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी आंबेरीचे माजी सरपंच किशोर वाक्कर, आपू बांदेकर यांच्यासह मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.
