मालवण शहरातील वीज पुरवठा उद्या बंद…

⚡मालवण ता.१९-:
मालवण शहरातील वीज महावितरण कंपनीच्या ३३/११ केव्ही जी.आय.एस उपकेंद्र मधील नादुरुस्त ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सोमवार दि. २० मे रोजी करण्यात येणार आहे. यामुळे मालवण वीज उपकेंद्र बंद राहणार असल्याने मालवण शहराला होणारा विद्युत पुरवठा सकाळी ८:३० ते सायंकाळी ६:३० या वेळेत खंडीत राहणार आहे. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी आणि वीज महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन वीज कंपनीच्या मालवण शहर सहाय्यक वीज अभियंत्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page