मालवणात मुलांसाठी निसर्गशाळा उपक्रमाचे आयोजन…

⚡मालवण ता.१८-:
मालवण मधील युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमेट या ग्रुप्सतर्फे मुलांसाठी निसर्गशाळा या अभिनव उपक्रमाचे आयोजन दि. १५ जुलै पासून दर शनिवारी सायंकाळी ४ ते ६ यावेळेत करण्यात येणार आहे.

या निसर्गशाळेत मुलांना निसर्गाच्या सानिध्यात नेऊन निसर्गातील विविध गोष्टींची माहिती व शिकवण दिली जाणार आहे. वय वर्षे १० ते १४ या वयोगटातील मुलांसाठी हा उपक्रम आहे. या निसर्गशाळेत प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी ७७९८०४०४०२ व ९३०७४८७९८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page