मोटारसायकल रॅलीद्वारे ‘माझे वीजबिल माझी जबाबदारी’चा उपक्रम…

सिंधुदुर्ग मंडळातर्फे महावितरण कार्यालय कुडाळ ते बॅरिस्टर नाथ पै. विद्यालय कुडाळ असे मोटारसायकल रॅलीचे आयोजन

*💫कुडाळ दि.२८-:* महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाकडून महा कृषी ऊर्जा अभियान १ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत राबवण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर महावितरण कंपनी सिंधुदुर्ग मंडळातर्फे महावितरण कार्यालय कुडाळ ते बॅरिस्टर नाथ पै. विद्यालय कुडाळ असे मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली तून माझे वीजबिल माझी जबाबदारी या संकल्पनेची प्रसिध्दी करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी बॅरिस्टर नाथ पै. विद्यालयाचे संस्थाध्यक्ष गळवणकर व प्राध्यापक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच यावेळी संस्थाध्यक्षानी व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी माझे विज बिल माझी जबाबदारी हे स्टिकर्स वाटले आहेत. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील यांनी मुलांना स्टिकर देत पालकांना वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page