पाटथर येथील गगनगिरी महाराज सत्संग केंद्राचा उद्या १६ मे रोजी वर्धापन दिन…

⚡देवगड ता.१६-:
देवगड तालुक्यातील पाटथर येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सत्संग केंद्राचा दुसरा वर्धापन दिन व श्री सत्यनारायण महापूजा १६ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.यानिमित्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सत्संग केंद्र पाटकर श्री प्रकाश यशवंतपुर यांच्या निवासस्थानी (मारुती मंदिरा नजीक)
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गगनगिरी महाराज ट्रस्ट गगनगड गगनबावडाचे विश्वस्त संजयसिंह पाटणकर, गगनगिरी महाराज आश्रम कोंडीवळे ओणी तालुका राजापूरचे मठाधिपती परमपूज्य उल्हासगिरी महाराज, गगनगिरी महाराज आश्रम बुरंबाळी राधानगरीचे मठाधिपती सदानंदगिरी महाराज, गगनगिरी महाराज आश्रम दाजीपुरचे मठाधिपती परमपूज्य दीपकगिरी महाराज, ह भ प अनंतगिरी बुवा पुजारी गोवा हे उपस्थित राहणार आहेत. या निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये पहाटे ५.३० वाजता काकड आरती, नामस्मरण, मंगल आरती, सकाळी ७.३० वाजता स्वामी गगनगिरी महाराज, पादुका अभिषेक सकाळी ९ वा.श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी १०.३० वाजता उपस्थित साधूंचे पाद्यपूजन, सकाळी ११ वाजता परमपूज्य उल्हासगिरी महाराज यांचे प्रवचन, सकाळी दुपारी १२ वाजता महाआरती,१२.३० वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता विविध भजने, सायंकाळी ७:३० वाजता सत्संग, रात्री ९ वाजता आरती व महाप्रसाद असे आयोजन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page