⚡कणकवली ता.१५-: गोव्याहून मुंबई दिशेने जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील दुभाजकाला कारची जोरदार धडक बसली. कार पटली होऊन झालेल्या अपघातात 6 जण जखमी झाले. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटानजीक असलेल्या वळणावर बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडला. कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातग्रस्तांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
हळवल फाटा येथील कार अपघात 6 जण जखमी…
