हळवल फाटा येथे स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी…

⚡कणकवली ता.१२-: मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा स्ट्रीट लाईट बसविण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. हळवल फाटा येथील वळण अपघात प्रवण क्षेत्र आहे. फाट्यालगत असलेले वळण वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक आहे. रात्रीच्यावेळी याठिकाणी लाईट नसल्यामुळे वळणाचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात झाले आहेत. त्यातच रात्रीच्यावेळी याठिकाणी सरपटणारे प्राणी व मोकाट जनावरांचा वावर असतो. त्यामुळे याठिकाणी स्ट्रीट लाईट बसविणे नितांत गरजेचे आहे. स्ट्रीट लाईट बसविण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना ग्रामस्थांनी दिले होते. त्यानंतर याठिकाणी स्ट्रीट लाईट लावण्याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही झाली होती. मात्र, अद्यापही सदर ठिकाणी स्ट्रील लाईट लावण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page