हजारो लिटर पाणी वाया:मे महिना असल्याने पाण्याची मोठी गरज भासते..
⚡वेंगुर्ले ता.१०-: शिरोडा रेडी जोडणाऱ्या पुल जवळ आज दुपारी तिलारी पाणी योजनेची पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
या प्रकाराबाबत संबंधित विभागाला शिरोडा ग्रामस्थांकडून कळविण्यात आले आहे. सध्या मे महिना असल्याने पाण्याची मोठी गरज भासत आहे. शिरोडा गावात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे काम सुरू असल्याने शिरोड्या मधील अनेक ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान तिलारी पाणी योजना अद्याप सुरू झाली नसली तरी पाण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईन द्वारे टेस्टिंग चालू आहे. मात्र आज दुपारी शिरोडा रेडी मार्गावरील पाईपलाईन खराब झाल्याने तेथून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
