सावंतवाडी शहरात अनेक प्रभागात गढूळ पाणी…

लोकांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळला तर गप्प बसणार नाही; महेश पांचाळ यांचा पालिका प्रशासनाला इशारा ..

⚡सावंतवाडी ता.१०-: शहरात अनेक प्रभागात पुरवठा होणारे पाणी पुन्हा गढूळ येत आहे. गेले ८ ते १० दिवस हा प्रकार सुरू आहे. याबाबतची माहिती भाजपचे य कार्यकर्ते महेश पांचाळ यांनी दिली. याबाबत वारंवार पालिका प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे रोगराई पसरली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. दरम्यान याबाबत लोकांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळला तर गप्प बसणार नाही असा इशारा देखील श्री. पांचाळ यांनी यावेळी नगरपालिका प्रशासनला दिला.

You cannot copy content of this page