केसरी धनगरवाडीत कमी दाबाचा वीज पुरवठा…

नवीन टान्सफार्मर कार्यान्वित करा ; उपसरपंच संदीप पाटील यांची मागणी.

⚡सावंतवाडी ता.०९-: केसरी – धनगरवाडीत कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यात धनगर बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या वाडीत नविन ट्रान्सफार्मर मंजूर आहे मात्र त्याचे काम गेले तीन महिने प्रलंबित आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून याची तात्काळ दखल घेऊन हा ट्रान्सफॉर्मर त्वरित कार्यान्वित करावा अशी मागणी केसरी उपसरपंच संदीप पाटील यांनी केली आहे.

सध्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे धनगर बांधव अक्षरशः हैराण झाले आहेत. कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे कृषी व विद्युत पंपांसह विद्युत उपकरणे चालत नाही. त्यामुळे धनगर बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ग्रामस्थांच्या मागणीनंतर जिल्हा नियोजन मधून या वाडीवर नवीन ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात आला. परंतु या ट्रांसफार्मरचे काम गेले तीन महिने संथ गतीने सुरू आहे. याबाबत ठेकेदारासह वीज वितरण कंपनीचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले परंतु कोणतेही कार्यवाही होत नाही. त्यामुळे विज वितरणच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page