⚡कणकवली ता.०९-: कळसुली शिक्षण संघ, मुंबई संस्थेच्या प्रेरणेने आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या सहकार्याने रविवार 12 मे रोजी सकाळी 9 वाजता कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड आर्टस्, कळसुली येथे स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.
प्रशालेचे माजी विद्यार्थी तसेच आजी व माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ, माहेरवाशींनी, हितचिंतक, संस्था पदाधिकारी व सदस्य यांचा स्नेहमेळावा कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे अध्यक्ष पी. एस. दळवी यांच्या अध्यक्षतेखली होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झारापचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय यावेळी कळसुली शिक्षण संघ मुंबईचे कार्याध्यक्ष सुर्यकांत दळवी, सचिव विजय सावंत, खजिनदार जय दळवी, मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे, सरपंच सचिन पारधीये, जयवंत घाडीगावकर, शिवाजी गुरव के. आर. दळवी आदी मान्यवर तसेाा माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष सत्यवान परब, कार्याध्यक्ष हनुमंत सावंत, उपकार्याध्यक्ष कमलाकर राणे, उपसचिव विश्वास दळवी यांची उपस्थिती असणार आहे. या स्नेह मेळाव्याला सर्व माजी विद्यार्थी, आजी- माजी शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष सत्यवान परब, सचिव दीपक दळवी यांनी केले आहे.
