तांबळडेगच्या शिला कोचरेकर यांचे दुःखद निधन…

⚡देवगड ता.०९-: तांबळडेग गावच्या रहिवासी श्रीमती शिला श्रीकांत कोचरेकर यांचे ९ मे रोजी दुपारी तीन वाजता कांदिवली मुंबई येथे अल्प आजाराने दुःखद निधन झाले. तांबळडेग येथील महिलांना भजनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न करून भजन मंडळ काढण्यात पुढाकार घेतला होता. त्या नेहमी धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होऊन सहकार्य करीत असत.

मृत्यूसमयी त्या ८५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात शंकर, राजेंद्र हे दोन मुलगे, सुना व एक विवाहित कन्या असा परिवार आहे. त्या माई कोचरेकर या नावाने सर्वत्र परिचित होत्या. स्वर्गीय प्राथमिक शिक्षक श्रीकांत कोचरेकर यांच्या त्या पत्नी होत्या. त्या परोपकारी वृत्तीच्या व त्यांचा स्वभाव लोभसवाणा होता. त्यांच्या निधनाने तांबळडेग गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर कांदिवली वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहवेदना व्यक्त केल्या.

You cannot copy content of this page