हरिचरणगिरी किनाऱ्यावर आज सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला…

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी हरिचरणगिरी येथील समुद्र किनाऱ्यावर अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.
आज सकाळी समुद्रातून वाहत येऊन हरिचरणगिरी येथील किनाऱ्यावर लागलेल्या या मृतदेहाबाबत वेंगुर्ले पोलिसांना कळविण्यात आले असून वेंगुर्ले पोलीस घटनास्थळी दाखल होणार आहेत.
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आढळून आलेल्या या मृतदेह बाबत संशय व्यक्त केला जात आहे.
परंतु आपल्या परिसरामध्ये कुणी व्यक्ती बेपत्ता असल्यास वेंगुर्ले पोलीस स्टेशनची संपर्क साधावा .

You cannot copy content of this page