आंबोली घाटात धबधब्याकडे काम करताना मधमाश्यांच्या हल्ल्यात एक गंभीर…

आंबोली,ता.८: घाटातील आणखी 2 धबधब्याकडे रेलिंग चे काम वनविभागाचे सुरू आहे.याचदरम्यान आज त्याठिकाच्या कामगारांवर आग्या मधमाश्यांनी हल्ला चढविला. यात ड्रायवर असणारे बबलू चव्हाण हे गंभीर जखमी झाले.त्यांना आंबोली आरोग्य केंद्रात उपचार करून हत्तीर्गे गडींग्लज येथील रुग्णालयात अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले.त्याच्याबरोबर असणारे ४ कामगार देखील जखमी झाले त्यांना आंबोली आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अचानक आग्या माश्यांनी हल्ल्या केल्यामुळे वनविभागाचे काम चर्चेत आले आहे.या ठिकाणी वनखात्याचे काम सुरू आहे तेथे जनरेटर सुरू करण्यात आला.त्याठिकाणी वळणावर एका झाडावर “कोनगा” आग्या माश्या चे मोठे पोळे दिसत होते।या ठिकाणी जनरेटर चा धूर लागल्याने माश्या उठल्या आणि ड्रायवर ला लागल्या.याठिकाणी गाडीतून बांधकामावर पाणी मारण्यासाठी जनरेटर सुरू करत होता.यात बबलू चव्हाण अत्यवस्थ झाला.कामगार देखील जखमी झाले. यापूर्वी ६ वर्षपूर्वी माकडांनी माश्या उठवून स्टॉल धारकांना जखमी झाल्यावर वडे भजी खाऊन कोल्ड्रिंक च्या बाटल्या देखील घाटात खाली नेऊन ठेवल्या होत्या.

You cannot copy content of this page