ओवळीये गावात डांबर प्लांट उभारणीस ग्रामस्थांनी केला तीव्र विरोध…

⚡मालवण ता.०८-:
ओवळीये गावात डांबर प्लांट उभारणीस ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून याबाबत ठरावही ग्रामसभेत घेण्यात आला आहे. डांबर प्लांट पर्यावरण व आरोग्यास हानिकारक आहे. या ग्रामस्थांच्या भूमिकेसोबत आम्ही सर्वजण ठाम आहोत. अशी भुमिका मालवण पंचायत समिती माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी स्पष्ट केली आहे.

ओवळीये ग्रामपंचायतच्या मागील ग्रामसभेत चर्चेत ठेवण्यात आलेल्या विषयात प्रसाद लक्ष्मण आंगणे यांना डांबर प्लांट/बॅच मिक्स प्लांट बसविण्यासाठी नाहरकत दाखला देणेबाबतच्या अर्जाचे वाचन सभागृहात करण्यात आले. त्याच बरोबर परबटेंबवाडी/कूळकरवाडी येथील ग्रामस्थांचा विरोधाचा अर्ज ग्रामसभेसमोर वाचन करण्यात आले. दोन्ही अर्जाचे वाचन करून झाल्यावर सदरील प्रकल्प पर्यावरण व आरोग्यास हानीकारक असल्याने नाहरकत ग्रामपंचायतीने देवू नये असे सुचविण्यात आले. त्यानंतर प्रसाद लक्ष्मण आंगणे यांनी सभा अध्यक्ष व सचिव यांना विचारणा केली की, सदरील प्रकल्प हा पर्यावरण व आरोग्यास हानीकारक आहे हे ग्रामस्थ ठरवु शकत नाहीत तेव्हा तुम्ही सांगावे. असा प्रश्न सभागृहा समोर मांडला. त्यावर सभा अध्यक्ष व सचिव यांनी सदरील प्रकल्प आरोग्यास हानिकारक आहे असे आरोग्य विभाग व वरीष्ठ कार्यालय ठरवू शकतात. परंतु ग्रामस्थांचा विरोध असल्याने सदरील प्रकल्पास नाहरकत देण्यात येवू नये असे सभागृहात बहुमताने ठरले असे स्पष्ट केले.

एकूणच या प्रश्न निर्णय बाबत संबंधित अर्जदार यांनी पंचायत समिती स्तरावर अपील केल्या नंतर त्यावर सुनावणी प्रक्रिया सूरू आहे. दोन्ही बाजू कडून याबाबत बाजू मांडली जाईल. मात्र आम्ही ग्रामस्थ यांच्या विरोधी भूमिके सोबत ठाम आहोत. डांबर प्लांट ला आमचा विरोधच राहील. अशी भुमिका माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी मांडली आहे.

दोन्ही वाडीच्या मध्येच क्रशर आता डांबर प्लांट

परब टेंबवाडी/कूळकरवाडी या दोन्ही वाडीच्या मध्येच क्रशर आहे. त्याचा त्रास ग्रामस्थ वस्ती तसेच पर्यावरणला होत आहे. आता त्या परिसरात डांबर प्लांट झाल्यास त्याचा अधिक त्रास ग्रामस्थ वस्ती व पर्यावरण यांना होणार आहे. त्यामुळे या डांबर प्लांट ला विरोध असून याला परवानगी देण्यात येऊ नये. अशी ग्रामस्थ यांची भुमिका असल्याचे सुनील घाडीगावकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page