शहरात महायुतीस ‘वन साईड’ वातावरण…

दीपक केसरकर: महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून दीपक केसरकर व संजू परब यांनी एकत्र घेतला आढावा..

⚡सावंतवाडी ता.०७-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शहरातील महायुतीच्या बुथवर भेटी दिल्या‌. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून त्यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.

ते म्हणाले, सावंतवाडी शहरात ‘वन साईड’ वातावरण असून महायुतीच्या बुथवर असणारी गर्दी बोलकी आहे अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली‌. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सर्वांधिक लीड देणार शहर सावंतवाडी असेल असा दावा त्यांनी केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, संजय पेडणेकर, रवी नाईक, अशोक पेडणेकर, एकनाथ पेडणेकर, बंड्या केरकर, शाम हळदणकर,सचिन साटेलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page