जिल्ह्यात ८० टक्के मतदान महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनाच मिळतील…

संजू परब यांना विश्वास:मंत्री राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर यांनी विकास केल्याने जनता परिवर्तन करणार

⚡सावंतवाडी ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक विकास कामे झाली आहेत. त्यामुळे नक्कीच जनता यावेळी भाजपसोबत राहून परिवर्तन करतील, असा विश्वास संजू परब यांनी आज येथे व्यक्त केला.

दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक दिलाने काम केल्याने या मतदारसंघातून 70 ते 80 टक्के मतदान भाजपला मिळेल असा विश्वास देखील श्री.परब यांनी यावेळी व्यक्त केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page