ईव्हीएम मशीन नेण्यासाठी एसटी बसेस ची व्यवस्था…

⚡कणकवली ता.०६-: लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया मंगळवार ७ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी मतपेट्या मतदान केंद्रावर नेण्यासाठी एसटीच्या ४७ बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यात या बसेस त्या त्या प्रभागानुसार मतपेट्या मतदान केंद्रावर नेणार आहेत. यावेळी सोबत पोलीस पथक, तसेच निवडणूक अधिकारी, कर्मचारी देखील उपस्थित असणार आहेत. कणकवली कॉलेज कणकवली येथून या एसटीच्या बस गाड्या मतपेट्या घेऊन मतदान केंद्रावर रवाना होत आहेत. दरम्यान निवडणूकीसाठी एस टी बसेस आरक्षित झाल्याने आज अनेक वस्ती च्या बसेस रद्द करण्यात आल्या, त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना दुचाकी, रिक्षा व इतर खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.

You cannot copy content of this page