अडीच लाखांच्या मताधिक्यात एकही मत कमी होणार नाही…

विनायक राऊत:नारायण राणेंचा दहशतवाद संपवला म्हणणारे दीपक केसरकर आज त्यांनाच घट्ट मिठी मारत आहेत…

⚡सावंतवाडी ता.०४-: अडीच लाखांच्या मताधिक्यात एकही मत कमी होणार नाही. ही भूमी पवित्र आहे. नारायण राणेंचा दहशतवाद संपवला म्हणणारे दीपक केसरकर आज त्यांनाच घट्ट मिठी मारत आहेत. अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली.

दरम्यान सींगल पैशाची चहा न पाजणारे भरभरून खिसा मोकळा करत आहे. शिवसेनेशी, ठाकरेंशी बेईमानी करणाऱ्यांना गाढण्याच काम कोकणी जनतेनं केलं.असे श्री राऊत यावेळि बोलताना म्हणाले.

तसेच राऊत पुढे बोलताना म्हणाले की आम्हाला खोक्यांची गरज नाही. आमच्याकडे बाळासाहेब, उद्धव ठाकरे यांच्यासह कोकणी जनतेचा आशीर्वाद आहे असं विधान खासदार विनायक राऊत यांनी केलं. लोकसभेला मला सावंतवाडीत मताधिक्य मिळेलच. पण, विधानसभेला तुमचं दुकान बंद होईल असा इशारा राऊत यांनी केसरकर यांना दिला. राणे – केसरकरांची झालेली अभद्र युती ही कोकणच्या विनाशासाठी झालेली आहे‌. इथला निसर्ग, सौंदर्य नष्ट करण्यासाठी झालेली आहे‌ अशी टीका केली.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न निकाली लावणार असही ते म्हणाले. शरीरात राम आहे तोवर ठाकरेंशी प्रामाणिक राहणार असल्याचे मत खा. राऊत यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page