मुंबई-गोवा हायवे पूर्ण न करणाऱ्या भाजपच्या ठेकेदारांना पळवून लावायची हीच वेळ…

आदित्य ठाकरे: ‘कोकणसाठी योगदान देणाऱ्या खासदार विनायक राऊत यांना दिल्लीला पाठवा..

⚡सावंतवाडी ता.०४-: मुंबई-गोवा हायवे पूर्ण न करणाऱ्या भाजपच्या ठेकेदारांना पळवून लावायची हीच ती वेळ आहे. त्यासाठी देशातूनही भाजपला पळवून लावलं पाहीजे. देशात ‘अब की बार, भाजप तडीपार’चा नारा आहे असं विधान आदित्य ठाकरेंनी केल‌. तर ‘वन हाफ’ परिवाराला ठाकरेंवर बोलण्याचा पगार मिळतो. पन्नास खोके क कहींनी व्हॅनिटीला वापरले असा आरोप करत नारायण राणे व दीपक केसरकर यांच नाव घेण आदित्य ठाकरे यांनी टाळलं.

कोकणसाठी योगदान देणाऱ्या खासदार विनायक राऊत यांना दिल्लीला पाठवा, मशालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अंधकार दूर करा असं आवाहन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केल. सावंतवाडी येथे इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते.

ते म्हणाले, पलिकडे एक सभा सुरू आहे. फुटलेले पक्ष, मिंदे गॅंग आहेत. जय श्री राम चा नारा दिला जात आहे‌. राम आमचाही आहे. आम्ही रामासह हाताला काम देखील मानतो. पण, कोकणचा हायवे हे पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे भाजपच्या ठेकेदारांना पळवून लावायची हीच ती वेळ आहे. त्यासाठी देशातूनही भाजपला पळवून लावलं पाहिजे. आता भाजप तडीपारीचा नारा देशभरात आहे असं विधान आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडीतील जाहीर सभेत केलं.

You cannot copy content of this page